भाऊ कदम बद्दल माहित नसलेल्या पाच गोष्टी

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने. 

Updated: Mar 3, 2016, 08:21 PM IST
भाऊ कदम बद्दल माहित नसलेल्या पाच गोष्टी  title=

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने. 

भाऊ कदमबद्दल न माहित असलेल्या पाच गोष्टी 

- भाऊ कदम याचे बालपण मुंबईतील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये त्यांचे बालपण गेले. 

- वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. 
 
- घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होता भाऊ, पण त्यात भागत नसल्याने त्याने भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली. 

- पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ 500 नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले. 

- भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील ब-याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव 'फू बाई फू'साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी 'फू बाई फू'ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिस-यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. 'फू बाई फू'च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.