आमिरविषयी माहित नसलेल्या या पाच गोष्टी

मुंबई : बॉलिवूडमध्ये ज्याची मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानचा आज ५१वा वाढदिवस आहे. 

Updated: Mar 14, 2016, 01:25 PM IST
आमिरविषयी माहित नसलेल्या या पाच गोष्टी title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये ज्याची मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानचा आज ५१वा वाढदिवस आहे. आज त्याच्या आईच्या इच्छेनुसार तो आपला वाढदिवस त्याच्या घरीच साजरा करतोय. आमिर आज जरी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या जीवनातील काही पैलूंविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे.

१. 'कलाम' कनेक्शन
अनेकांना माहितही नसेल स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते अबुल कलाम आझाद यांच्या कुटुबाशी आमिरचे नातं आहे.

२. बालवयात पदार्पण
खरं तर आज मिस्टर परफेक्शनिस्ट असणाऱ्या आमिर खानने अगदी वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. १९७३ साली 'यादों की बारात' मधील एका गाण्यात त्याने पाहुण्या बालकलाकाराची भूमिका केली होती.

३. शिक्षण
आमिरचं शिक्षण अनेक शाळांमध्ये झालंय. पूर्व प्राथमिक शिक्षण त्याने जे बी पेटिट शाळेत घेतलंय. तर आठवीपर्यंत तो बांद्र्याच्या सेंट अॅन्स शाळेत होता. तर नववी आणि दहावीचं शिक्षण त्याने माहिमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेत घेतलंय. तर मुंबईतील प्रसिद्ध नरसी मोनजी महाविद्यालयात त्याने उच्च शिक्षण पूर्ण केलं.

४. खेळाडू खान
मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा आमिर प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एक चांगला खेळाडूही आहे. त्याने राज्य स्तरावर टेनिसचे सामने तो खेळलाय. 

५. रंगमंचावरील आमिर
मोठ्या पडद्यावर येण्याआधी आमिर 'अवांतर' नावाच्या एका नाटक समूहाचाही भाग झाला होता. तिथे त्याने पडद्यामागील अनेक कामे केली. तो अनुभव त्याला अभिनेता होण्यासाठी कामी आला. 'केसर बिना' नावाच्या गुजराती नाटकाच्या एका प्रयोगातही त्याने अभिनय केला आहे.