फर्स्ट लूक : शाहिद, करीना, आलिया, दिलजीतचा 'उडता पंजाब'!

आगामी 'उडता पंजाब' या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या पोस्टरवर शाहिद कपूर, आलिया भट्ट, दिलजीत दुसांझ आणि करीना कपूर दिसत आहेत. 

Updated: Feb 24, 2015, 05:30 PM IST
फर्स्ट लूक : शाहिद, करीना, आलिया, दिलजीतचा 'उडता पंजाब'! title=

नवी दिल्ली : आगामी 'उडता पंजाब' या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या पोस्टरवर शाहिद कपूर, आलिया भट्ट, दिलजीत दुसांझ आणि करीना कपूर दिसत आहेत. 

पोस्टरवरचा करीना कपूरचा लूक पाहून ती या सिनेमात एक गंभीर भूमिका निभावणार असल्याचं दिसतंय. या सिनेमासाठी खास करीनानं पंजाबी बोलणंही शिकून घेतलंय. 


उडता पंजाब

सिनेमात पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दुसांझ याचीही महत्त्वाची भूमिका आहे. पंजाबमध्ये सक्रीय असणारे ड्रग्ज माफिया आणि प्रेमकथेच्या धर्तीवर या सिनेमाचं कथानक गुंफलं गेलंय. हा सिनेमा दिग्दर्शित केलाय अभिषेक चौबे यांनी... 

करीना  - शाहीद ही जोडी यापूर्वी शेवटचं 'मिलेंगे मिलेंगे' या सिनेमात एकत्र दिसली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.