मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर आहे.
शीख समुदायात किरपाणला धार्मिक महत्त्व आहे. ढिशूम चित्रपटातील एका गाण्यात जॅकलिनने किरपाण घेऊन डान्स केला आहे. त्यामुळे रविंद्र सिंग बस्सी यांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जॅकलिनसह 'ढिशूम' चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक रोहित धवन यांच्यावर देखील फौजदारी खटला दाखल करण्यात आला.
किरपाणसारख्या धार्मिक वस्तूचा अनादर केल्याची तक्रार समुदायातर्फे करण्यात आली होती. दरम्यान, १ जुलै रोजी कोर्टात यावर पुढील सुनावणी होणार आहे.