सुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीविरुद्ध तक्रार

सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा लता यांच्यावर आरोप आहे.

Updated: Jun 16, 2015, 09:29 AM IST
सुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीविरुद्ध तक्रार title=

बंगळुरू : सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा लता यांच्यावर आरोप आहे.

लता यांच्याविरोधात फसवणूक आणि लबाडी केल्याप्रकरणी हलसूलगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, लता यांनी बनावट लेटरहेड बनवून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या कोच्चाडियान चित्रपटाला आर्थिक मदत केल्यावरून हे प्रकरण निर्माण झालेले आहे.

ऍडब्युरो आणि त्यांच्या कंपनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आर्थिक कारणावरून वाद सुरू आहेत. ऍडब्युरोचे व्यवस्थापकीय संचालक अबीरचंद नहार यांनी तक्रार दाखल केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.