सनी लिओनविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी सेक्सी कॉमेडी सिनेमा 'मस्तीजादे' लवकरच प्रेक्षकांसमोर धडकणार आहे... परंतु, त्यापूर्वीच सनी कायद्याच्या कचाट्यात अडकलीय. 

Updated: Feb 10, 2016, 06:04 PM IST
सनी लिओनविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी सेक्सी कॉमेडी सिनेमा 'मस्तीजादे' लवकरच प्रेक्षकांसमोर धडकणार आहे... परंतु, त्यापूर्वीच सनी कायद्याच्या कचाट्यात अडकलीय. 

'मस्तीजादे' या चित्रपटात सनीसोबत वीर दास आणि तुषार कपूर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहत. या संपूर्ण टीमविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. 

दिल्लीच्या आदर्श नगर पोलीस स्टेशनमध्ये या चित्रपटाच्या टीमविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय. 

या चित्रपटात एका मंदिरात कंडोमची जाहिरात अश्लील पद्धतीनं करताना दाखवल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आलीय.