प्रियांका भाड्याच्या घरातून स्वप्नातल्या बंगल्यात

मुंबईत हवं तसं घर घेणे, कुणासाठीही सोपी गोष्ट राहिलेली नाही, बॉलीवूड स्टार प्रियांका चोपडालाही याबाबत तसाच अनुभव आलाय, पण शेवटी तिच्या मनातलं घर तिला मिळालं आहे.

Updated: Jul 22, 2015, 03:37 PM IST
प्रियांका भाड्याच्या घरातून स्वप्नातल्या बंगल्यात title=

मुंबई : मुंबईत हवं तसं घर घेणे, कुणासाठीही सोपी गोष्ट राहिलेली नाही, बॉलीवूड स्टार प्रियांका चोपडालाही याबाबत तसाच अनुभव आलाय, पण शेवटी तिच्या मनातलं घर तिला मिळालं आहे.

प्रियांका चोपडा, आता अंधेरी वेस्टमधील यारी रोडवरील एका अपार्टमेंटमधील भाड्याच्या घरात राहते, मात्र लवकरच प्रियांका मुंबईतील विलेपार्ले भागात शिफ्ट होणार आहे.

प्रियांकाच्या घरा विषयी एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार तसेच तिच्या निकटवर्तीयांनी म्हटलं आहे, "प्रियांका एका वर्षापासून मोठी जागा पाहत आहे, ज्या घरात ती भाऊ आणि आईसोबत राहणार आहे. प्रियांकाकडे मुंबईत सध्या तीन फ्लॅट आहेत, पण प्रियांकाच्या स्वप्नातला बंगला तिला आता मिळाला आहे".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.