फिल्म रिव्ह्यू: 'तू ही रे' प्रेमाचा हटके त्रिकोण

दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी या सिनेमांची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे ती 'तू ही रे' हा सिनेमा घेऊन... संजय जाधव दिग्दर्शित, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित स्टारर 'तू ही रे' हा सिनेमा बिग स्क्रीनवर झळकलाय.  

Updated: Sep 6, 2015, 09:06 AM IST
फिल्म रिव्ह्यू: 'तू ही रे' प्रेमाचा हटके त्रिकोण title=

मुंबई: दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी या सिनेमांची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे ती 'तू ही रे' हा सिनेमा घेऊन... संजय जाधव दिग्दर्शित, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित स्टारर 'तू ही रे' हा सिनेमा बिग स्क्रीनवर झळकलाय.  

कथानक

'तू ही रे' अगदी सिनेमाच्या टायटलवरुनच तुम्हाला कळलं असेल की हा सिनेमा एक लव्ह स्टोरी आहे. या सिनेमातली कथाही फुल्ल टू फिल्मी स्टाईलचीच आहे. नंदिनी, भैरवी आणि सिद्धार्थ या तिघांची ही गोष्ट. सिद्धार्थ आणि नंदिनीचा सुखी संसार चालू असतानाच खासदार प्रतापराव भानुशाली यांची एंट्री होते. सिद्धार्थच्या कंपनीला २२ कोटींचं अनुदान देण्याचं आश्वासन ते करतात पण त्याबद्ल्यात सिद्धार्थपुढे काही अटी मांडल्य जातात.. हा प्रस्ताव ऐकताच सिद्धार्थ बेचैन होतो आणि अचानक त्याचा भूतकाळ त्याच्या पुढे उभा राहतो. बेसिकली 'तू ही रे' ही एक लव्हस्टोरी असून, या सिनेमात सिद्दार्थ, नंदिनी आणि भैरवी यां तिघांचा लव्ह TRIANGLE यात रेखाटण्यात आलाय.

आणखी वाचा - पाहा, सईचा देसी लूक, आणि ४ सुपर हिट गाणे

सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये फार काही कंटेन्ड नाही.  नंदिनी आणि सिद्धार्थ यांच्यातला रोमॅन्स, त्यांची मुलगी पीऊ यांची मस्ती या पलिकडे फर्स्ट हाफमध्ये काही नाही. सिनेमा पाहताना सिनेमाचा स्क्रीनप्ले बऱ्याचदा खटकतो. 'तू ही रे' या सिनेमाची खरी मजा आहे याच्या सेकंन्ड हाफमध्ये.  खरं तर इंटर्वलनंतर सिनेमा स्पीड पकडतो, प्रेक्षकांना होल्ड करण्यात यशस्वी ठरतो.

संगीत
या सिनेमाचं संगीत छान झालंय. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांनी सिनेमाला संगीत दिलंय.. सुंदरा, गुलाबाची कळी, तोळा तोळा... ही गाणी छान झालीयेत.. सिनेमाची सिनेमाट़ग्राफी आणि संवादही सुंदर आहेत.

दिग्दर्शन
दिग्दर्शक संजय जाधवनं सिनेमाच्या कथेची हाताळणी छान केलीये. विशेष करुन सिनेमाचा उत्तरार्ध छान झालाय. सिनेमाची कथा असो, मांडणी असो किंवा प्रेझेंटेशन या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलंय. कलाकारांच्या कपड्यांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलंय. खूप लॅव्हिश आणि ग्लॅमरस पद्धतीनं त्यांना प्रेसेंट केलंय. सिनेमातील लॉकेशन्सही सुंदर आहेत.

अभिनय
राहता राहिला प्रश्न कलाकारांच्या अभिनयाचा तर त्याबाबतीत यातल्या तिन्ही प्रमुख नटांना १० ऑन १०... स्वप्निल जोशी यानं चोख अभिनय केलाय आणि हो त्यात नेहमी प्रमाणे त्याची शाहरुख स्टाईलही दिसून येतेच. सई ताम्हणकर जिनं यात नेहमी पेक्षा काहीतरी हटके करायचा प्रयत्न केलाय आणि त्या ती बऱ्यापैकी यशस्वी ही झाली आहे. तेजस्विनी पंडियचा विशेष उल्लेख करावासा वाटतो कारण पहिल्यांदाच ती रुपेरी पडद्यावर इतक्या ग्लॅमरस पद्धतीनं प्रेसेंट झाली आहे. तिच्या भूमिकेला तिनं नक्कीच न्याय दिलाय. अभिनेता सुशांत शेलार आणि गिरिश ओक यांनीही आपआपल्या भूमिका छान बजावल्यात. तेव्हा 'तू ही रे' हा एक वन टाईम वॉच असा सिनेमा असून या सिनेमाला आमही देतोय ३ स्टार्स. 

आणखी वाचा - व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.