जयंती वाघधरे, मुंबई : उपेंद्र लिमये आणि विणा जामकर हे दोन्ही टॅलेंटेड कलाकार सरपंच भगीरथ या सिनेमा पहिल्यादाच एकत्र काम करताना दिसतायत. हा सिनेमा आज सिल्वर स्क्रीनवर झळकलाय.
हा सिनेमा जरी ग्रामीण पार्श्वभूमिवरचा असला तरी सिनेमात वास्तव मांडण्यात आलाय. ही गोष्ट आहे भगीरथ नावाच्या एका सरपंचाची... त्याच्या कुटुंबाची... आजच्या समाजाची... समाजाला लागलेल्या आरक्षण, जातीवाद, गरीब श्रीमंत भेदभाव असे अनेक पैलू या सिनेमात मांडण्यात आलेत.
भगीरथ हा तरुण जेव्हा सरपंच पद गाठतो, तेव्हा त्याला गावातल्या जातीवाद, भेद भाव करणाऱ्या लोकांची मानसिकता पाहून खूप त्रास होतो. गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या या सरपंचाला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. एव्हढच काय तर आपल्या होणाऱ्या बाळाची किंमत ही त्याला यामुळे मोजावी लागते. दोन मुलांपुढे तिसरं मुल झालं तर सरपंच पद सोडावं लागेल, अशी अट त्याला घालण्यात येते... मग काय घडतं... तो काय निर्णय घेतो? त्याच्या या निर्णयामुळे त्याचं आयुष्य कसं बदलतं या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणारा सरपंच भगीरथ हा सिनेमा आहे.
नेहमीप्रमाणे अभिनेता उपेंद्र लिमये चांगलीच बॅटींग केलीय तर दुसरीकडे अभिनेत्री विणा जामकरनं ही आपली भूमिका चोखपणे पार पाडला आहे. सिनेमा जरी ग्रामीण पार्श्वभूमीवरचा असला तरी सरपंच भगीरथमध्ये वास्तव मांडण्यात आलंय. दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी सिनेमाला योग्य ती ट्रीटमेंन्ट देण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या या आधीही अनेक सिनेमात पहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे सिनेमात खूप काही नाविन्य असं पहायला मिळत नाही.