सिनेमा : प्यार का पंचनामा 2
दिग्दर्शक : लव रंजन
कलाकार : कार्तिक आर्यन, नुशरत भरुचा, सोनाली सहगल, इशिता शर्मा, ओमकार कपूर, सन्नी सिंग
वेळ : 136 मिनिटे
मुंबई : 2011 साली प्यार का पंचनाला हा सिनेमा दिग्दर्शक लव रंजन यांनी केला होता. पुन्हा दोन वर्षांनी 'आकाश-वाणी' हा सिनेमा घेऊन ते आले, पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता 2015 मध्ये 'प्यार का पंचनामा' या सिनेमाचा सिक्वल 'प्यार का पंचनामा 2' घेऊन ते पुन्हा सिल्वर स्क्रिनवर दाखल झालेत.
गोगो, चौका आणि ठाकूर या तीन मित्रांची ही गोष्ट... या तिघांच्या आयुष्यात चिकू, सुप्रिया आणि कुसुम या मुली असतात... या तिन्ही जोड्यांची लव्हस्टोरी, जरा विनोदी ढंगानं यात रेखाटण्यात आलीय. मुलं जेव्हा बॅचलर असतात तेव्हाचं त्यांचं आयुष्य आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यात एक मुलगी येते तेव्हा काय होतं... अशा काहीशा बॅकग्राउंडवरचा हा सिनेमा आहे...
VIDEO : 'प्यार का पंचनामा - २'चा धम्माल ट्रेलर
या सिनेमातला या तिन्ही जोड्यांचा परफॉरमन्स चांगला झालाय. अभिनेता सनी सिंगचा कॉमेडी टाइमिंग कमाल आहे. खरं तर 'प्यार का पंचनामा 2' हा एक अडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमातल्या तीनही अभिनेत्रींना अनेक बोल्ड सीन देण्यात आलेत, जे या तिघींनीही सहज पार पाडलेत.
सिनेमातली गाणी सिनेमाच्या थीमप्रमाणे आहेत हे तर खरं पण अनेक गाणी अशी ही आहेत ज्यांची सिनेमात गरजच नव्हती. अशा गाण्यांमुळे सिनेमाच्या गतीवर याचा परिणाम होतो.
या सिनेमाची जी गोष्ट खटकते ती म्हणजे या सिनेमाची लेन्थ... काही नको असलेल्या सीन्स आणि गाणीमुळे सिनेमा बोर वाटू लागतो... पहिल्या सिनेमाच्या तुलनेत या सिनेमात खूप काही नाविन्य पाहायला मिळतं तर तसं ही नाही.. हो पण सिनेमा मात्र टाइमपास एन्टरटेन्मेंट आहे एवढ नक्की...
या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही 'प्यार का पंचनामा 2' या सिनेमाला देतेय 3 स्टार्स...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.