फिल्म रिव्ह्यू : 'नाम शबाना'... तिच्या मिशनची कहाणी

बेबी, पिंक, सारख्या दर्जेदार सिनेमातून आपली अदाकारी दाखवणारी अभिनेत्री तापसी पन्नूचा आज 'नाम शबाना' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 'बेबी' या सिनेमाच्या टीमचा 'नाव शबाना' हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमाचं वैशिट्य म्हणजे हा एक सिक्वल नसून प्रिक्वल आहे...

Updated: Mar 31, 2017, 01:15 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'नाम शबाना'... तिच्या मिशनची कहाणी title=

मुंबई : बेबी, पिंक, सारख्या दर्जेदार सिनेमातून आपली अदाकारी दाखवणारी अभिनेत्री तापसी पन्नूचा आज 'नाम शबाना' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 'बेबी' या सिनेमाच्या टीमचा 'नाव शबाना' हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमाचं वैशिट्य म्हणजे हा एक सिक्वल नसून प्रिक्वल आहे...

शिवम नायर ज्यांनी या आधी आहिस्ता आहिस्ता, महारथी, भाग जॉनी सारखे सिनेमे केलेत, त्यांनीच नाम शबाना या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तापसी पन्नू, अक्षय कुमार, मानोज वाजपयी, अनुपम खेर, डॅनी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे.

सिनेमाच्या नावाप्रमाणेच नाम शबाना हा सिनेमा शबानाचा आहे... 'बेबी' या सिनेमात अक्षय कुमारसोबत नेपाळला जाऊन दहशदवाद्यांशी दोन हात करणारी शबाना आणि तिची कहाणी या सिनेमात मांडण्यात आलीय. 'बेबी' या सिनेमाचा हा प्रिक्वल असला तरी त्या सिनेमाचा आणि या सिनेमाचा फार संबंध येत नाही. कारण ही गोष्ट पूर्णपणे शबाना या व्यक्तिरेखेची आहे.

'नाम शबाना' ही गोष्ट आहे शबाना आणि तिच्या आईची... शबानाला फार मित्र मैत्रिणी नाहीत... ती फारशी कुणाशी बोलत नाही... काही कारणांनी तिला स्पेशल टास्क फोर्समध्ये सामीव व्हावं लागतं. शबाना एका मिशनवर असते, या मिशनमध्ये तिची साथ देतो याच स्पेशल टास्क फोर्सचा हेड, जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता मनोज वाजपाईनी... शबानाला तिच्या या मिशनमध्ये आणखी एका माणसाची मदत मिळते ती म्हणजे ऑफिसर अजय अर्थातच अक्षय कुमारची...

'बेबी' या सिनेमात तापसीची जरी छोटी भूमिका असली तरी ती लक्षात राहणारी होती. त्या सिनेमाप्रमाणेच या ही सिनेमात तापसीच्या वाट्याला अनेक अॅक्शन सीन्स आलेत आणि ते तापसीनं तितक्या दमदार पद्धतीनं पार पाडलेत. सिनेमाचे संवाद तगडे आहेत. सिनेमाटोग्राफी छान झालीय.