जयंती वाघधरे, मुंबई : या वर्षात बिग स्क्रिनवर आपल्या भेटीला आलाय एस्सेल व्हिजन निर्मीत, ओम राउत दिगदर्शित आणि सुबोध भावे स्टारर लोकमान्य, एक युगपुरुष हा सिनेमा रिलीज झाला आहे.
2014मध्ये टाईमपास, फँन्ड्री, लय भारी, डॉ प्रकाश बाबा आमटे, एलिझाबेथ एकादशी सारखे एकाहून एक दर्जेदार सिनमे दिल्यानंतर आता एस्सेल विझनचा लोकमान्य एक युगपुरुष हा सिनेमाही या आठवड्यात आपल्या भेटीला आलाय..
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणत ज्यांनी ब्रिटीशांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला.. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केलं.. आपल्या कुटुंबापेक्षाही देशातील जनततेची जास्त काळजी घेतली, असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.. यांच्या विचारांवर यांच्या ध्येय धोरणांवर आधारीत लोकमान्य एक युगपुरुष हा सिनेमा आहे ..
कथा :
लोकमान्य एक युगपुरुष हा सिनेमा जितका लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारीत आहे तितकाच तो त्यांच्या विचारांवर त्यांच्या तत्वांवर बेतलेला आहे.. अभिनेता सुबोध भावेनं या सिनेमात लोकमान्य टिळकांची प्रमुख भूमिका साकारली आहे.. ही कहाणी आहे आजच्या पिढीची, त्यांच्या संघर्षाची आणि या लढ्यात त्यांना प्रेरीत करणा-या लोकमान्य टिळकांच्या विचारांची..
खरंतर हा सिनेमा दोन वेगवेगळ्या काळात रेखाटण्यात आलाय.. मकरंद अर्थातच चिन्मय मांडलेकर हा तरुण पत्रकार आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतानाच एका दिवशी त्याला टिळकांची ध्वनिफीत ऐकायची संधी मिळते.. ही ध्वनिफित ऐकल्यानंतर त्याच्या मनात टिळकांविषयी आणखी अभ्यास करायची इच्छा निर्माण होते. टिळकांचा अभ्यास करता करता कुठेतरी टिळकांच्या विचारांनी तो इतका प्रेरीत होतो की आपली सामाजिक,राजकीय परीस्थिती ढासळत असतानाच टिळकांची त्यांच्या विचारांची गरच भासू लागते.. खरंतर कुठेतरी रंग दे बसंती या सिनेमाच्या थिमशी मिळता जूळता असा लोकमान्य एक युगपुरुष सिनेमा आहे.
अभिनय :
सुबोध भावेनं लोकमान्य टिळक या व्यक्तिरेखेसाठी खरंच खूप कष्ट घेतले असावेत आणि ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते.. या सिनेमातला त्याचा लूक विशेष करुन त्याचा मेकअप अप्रतिम झालाय आणि याचं श्रेय जातं विक्रम गायकवाड यांना.. त्याच्या परफेक्ट लूक प्रमाणेच त्याचा अभिनय ही परफेक्ट झालाय.. त्याची डायलॉग डेलेव्हरी, त्यानं ज्या प्रकारे आपलं कॅरेक्टर एकूणच कॅरी केलंय.. या सगळ्या गोष्टींसाठी या नटाला त्याला हॅट्सऑफ आहे.. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे... हा डायलोग म्हणताला त्यानं खरंच आपला प्राण ओतलाय हे दिसून येतं..
दिगदर्शन :
ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिगदर्शन केलंय.. त्यांनं यात फक्त दिगदर्शनाचीच बाजू सांभाळली आहे तर असं नाही.. कथा, स्क्रिनप्ले आणि सिनेमातल्या डायलॉग्समध्येही त्याचा सहभाग आहे.. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिला सिनेमा, आणि पहिला सिनेमा म्हणून अशा प्रकारच्या सिनेमाची निवड करणं खरंच त्याच्यासाठी चॅलेंजिंग असेल यात काहीच शंका नाही.. जसं मी म्हटलं रंग दे बसंती या सिनेमाशी मिळती जुळती थीम लोकमान्यला देण्यात आली आहे.. कधी हा सिनेमा तुम्हाला स्वतंत्र्यपूर्वीच्या काळात घेउन जातो तर कधी आजच्या नवीन युगात.. याची योग्यरीत्या मांडणी करणं खरंतर एक बिग टास्क आहे आणि याच प्रक्रियेत खरंतर दिगदर्शनाची गाडी अडकते.. पण त्याचा ही पहिलाच प्रयत्न असल्यामूळे या गोष्टी कदाचित दुरलक्ष होउ शकतात.. ही एक गोष्ट सोडली तर बाकी त्याचं दिगदर्शन उत्तम झालंय..
एकूणच...
सिनेमाच्या पहिल्या भागापेक्षा सेकंड हाफ जास्त अपिलिंग वाटतो, इंटरवलनंतर सिनेमा स्पीड घेतो आणि प्रेक्षकांना होल्ड करण्यातही ब-यापैकी यशस्वी झालाय.. ओमनं सेकंड हाफमध्ये जी कमाल दाखवली आहे ती थोडीशी पहिल्या भागात मिसिंग वाटते...
एकूणच सुबोधचा जबरदस्त अभिनय पाहता, सिनेमातले संवाद, आणि overall मांडणी पाहता, या सिनेमाला 3 स्टार्स.