फिल्म रिव्ह्यू : 'आय'... कमकुवत कथा, बेअसर स्क्रिन प्ले

Updated: Jan 17, 2015, 03:49 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'आय'... कमकुवत कथा, बेअसर स्क्रिन प्ले  title=

 

सिनेमा : आय (तमिळ)
दिग्दर्शक : शंकर 
संगीत : ए. आर. रेहमान 
कलाकार : विक्रम, अॅमी जॅक्सन, सुरेश गोपी, उपेन पटेल

मुंबई : साऊथचा फेमस डायरेक्टर शंकर याचा 'आय' हा बहुचर्चीत सिनेमा दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रिलीज झालाय. अॅक्शन थ्रिलर पठडीतला हा सिनेमा आहे. विक्रम,एमी जॅक्सन हे दोघे या सिनेमात लिड रोलमध्ये आहेत. तर मोझार्ट ऑफ मद्रास अर्थात ए. आर . रेहमान याने या सिनेमाला संगीत दिलं आहे.. डायरेक्टर शंकरने या सिनेमात व्हिज्यूअल इफेक्टचा भरपूर वापर केला आहे.

कथा 
विक्रमने या सिनेमात एका बॉडी बिल्डरची भूमिका साकारली आहे. 'मिस्टर इंडिया' या बॉडी बिल्डरच्या स्पर्धेत  सहभागी होणे हे त्याचे ध्येय असते. त्यासाठी तो आपल्या शरिरावर प्रचंड मेहनत घेतो. त्याच काळात त्याची ओळख अॅमी जॅक्सन शी होते आणि त्यानंतर या सिनेमाच्या स्टोरीला वेगळं वळण मिळतं... तो टर्निंग पॉईंटच या सिनेमाचा आत्मा आहे. 

अभिनय 
अभिनेता विक्रमने जबरदस्त अभिनय केला आहे. आजवर प्रत्येक सिनेमाचं क्रेडीत डायरेक्टर शंकरला मिळालं आहे. मात्र, 'आय' त्याला अपवाद आहे. या सिनेमावर विक्रमने ठसा उमटवला आहे. त्याने या सिनेमासाठी आपल्या बॉडीत एक्स्ट्रीम मेकओव्हर केला आहे. त्याने तीन वेगवेगळ्या शेड्स भन्नाटपणे साकारल्या आहेत.
अॅमी जॅक्सननेही आपली भूमिका चोख बजावलीय. उपेन पटेलनेही ठिकठाक काम केलं आहे.
 
दिग्दर्शन 
शंकरने यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांच्या तुलनेत त्याचा 'आय' हा सिनेमा कमकुवत वाटतो. विक्रमचा मेक अप वगळता शंकरने सिनेमाची स्टोरी आणि स्क्रिनप्लेवर फारसं लक्ष दिलं नाही. सिनेमात पुढे काय घडणार याची सहज कल्पना येते.  काही सीन वगळता सिनेमातला थ्रिलर कुठंच जाणवत नाही.

शेवटी काय तर...  
 डायरेक्टर शंकर याच्याकडून प्रेक्षकांना नेहमीच अपेक्षा असतात आणि तेच आयच्या बाबतीतही होतं. मात्र, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात शंकरला अपयश आलं आहे. 'ओव्हर ऑल' हा सिनेमा टेक्निकली चांगला असला तरी सिनेमाची स्टोरी आणि स्क्रिन प्ले कमजोर असल्यामुळे सिनेमा म्हणावा तेव्हढा इम्पॅक्टफूल झाला नाही. त्यामुळे या सिनेमाला मी देतेय २.५ स्टार... 

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.