FlimReview‬ : बाजीराव मस्तानीत केवळ दोघांची प्रेमकथा

बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच (disclaimer)  म्हणून जी पाटी येते त्यात व्हाइसओवरसकट हे सांगण्यात आलेय की हा सिनेमा काल्पनिक आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. हा सिनेमा केवळ 'राव' या कादंबरीवर आधारित आहे.

Updated: Dec 18, 2015, 04:22 PM IST
FlimReview‬ : बाजीराव मस्तानीत केवळ दोघांची प्रेमकथा  title=

मुंबई : बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच (disclaimer)  म्हणून जी पाटी येते त्यात व्हाइसओवरसकट हे सांगण्यात आलेय की हा सिनेमा काल्पनिक आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. हा सिनेमा केवळ 'राव' या कादंबरीवर आधारित आहे.

एक प्रेमकथा
Now finally for your information पिंगा हे गाणं स्वप्नातलं नाही. रिएलिटी मध्ये माहीत नाही पण या सिनेमात तरी काशीबाई आणि मस्तानी या दोघी एकत्र भेटल्या आहेत आणि एकत्र पिंगा केलाय.
बाजीराव मस्तानी हा सिनेमा केवळ बाजीराव आणि मस्तानी या दोघांची प्रेमकथा आहे बाकी या सिनेमात फार काही ग्रेट नाही.

सिनेमाचे चित्रिकरण
संजय लीला भंसाली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाच्या कथानकाप्रमाणे बाजीराव मस्तानी या सिनेमाचं टीपिकल संजय लिला भंन्साली स्टाइलनं चित्रिकरण करण्यात आलेय.

अभिनेता रणवीर सिंगने त्याचं पात्र पूर्ण इमानदारीनं हे साकारलंय या गोष्टींचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. मराठीले संवाद असो किंवा मराठी टोनमधले हिंदी डायलाँग्, रणवीर सिंगचा पर्फोरमन्स कमाल झालाय. त्याचं बोलणं असो किंवा ओव्हरऑल अभिनय, हे करताना रणवीरने नक्कीच मराठी भा़षेचा अभ्यास, खूप मेहनत घेतलीये हे जाणवतं. त्याच्या या परफॉर्मन्ससाठी, त्या लहेजासाठी रणवीरला १० पैकी १० स्टार.

सिनेमा लांबवलाय...
सिनेमाचे सेट्स, प्राँडक्शन वैल्यू, आर्ट डिरेक्शन पाहून काय बात है, म्हटल्या शिवाय राहवत नाही. बाजीराव मस्तानीची सिनेमेटोग्राफीही खूपच छान झालेय.
या सगळ्या गोषटीमध्ये जरी संजय लिला भंन्साली यांना यश मिळाळं असेल तरी सिनेमाचं स्क्रिप्ले कुठेतरी मागे पडतंय. सिनेमा खूप इंटरेस्टिंग ट्रेकवर जात असतानाच काही सीन्स लांबवण्यात आलेत.  यामुळे सिनेमाच्या फ्लोवर याचा परिणाम होतोना दिसतो.

प्रियांका नावापुरती
अभिनेत्री दीपिका पादुकोणनंही खूप चांगला अभिनय केलाय. एकीकडे ती घोडेस्वारी करताना दिसतेय तर दुसरीकडे कथक करताना.. एक फुल पैकेज अभिनेत्री म्हणून जी व्हर्सेटॅलिटी हवी ती तिच्यात दिसून येते..राहिला प्रश्न प्रियांका चोप्राचा तर एक दोन रोमांटिक आणि इमोशनल सीन्स सोडले तर तिच्या वाट्यााला फार काही ग्रेट नाहीच. पिंगा या गाण्यापूर्वी दीपिका आणि प्रियांकामध्ये रंगलेला संवाद, तो सीन सुंदर झालाय.