यंती वाघधरे, झी २४ तास : आजचा शुक्रवार हा जरा हटके आहे कारण आज भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आयुष्यावर बेतलेला 'अझहर' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमात इमरान हाश्मी प्रमुख भूमिका साकारतोय.
आजवर अनेक खेळाडुंच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक्स आपण बिग स्क्रिनवर पाहिलेत. मग तो मॅरी कॉम असो, भाग मिल्खो भाग असो किंवा इतर कुठला सिनेमा... यातच आता भर पडली आहे ती म्हणजे इमरान हाश्मी स्टारर 'अझहर' या सिनेमाची... 'बॉस' आणि 'ब्लू' यांसारखे सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक टोनी डीसूझा यांचा 'अझहर' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय..
हा सिनेमा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर बेतलेला असून, हा एक बोयोपिक सिनेमा आहे. अझहर या सिनेमाची सुरुवात होते हैदराबादमधून, जिथे अझरुद्दीनचं बालपण दाखवण्यात आलंय. नौरीनसोबत लग्न होतं आणि मग काही दिवसांनंतर संगिता त्याच्या आयुष्यात येते. याच दरम्यान मॅच फिक्सींगचा आरोप अझहरवर करण्यात येतो.. आणि एका क्षणातच अझरची सगळी लोकप्रियता संपुष्टात येते. या सगळ्या घटनांना 'अझहर' या सिनेमात सादर करण्याच्या प्रयत्न दिग्दर्शक टोनी डी सूझा यांनी केलाय.
सिनेमाला देण्यात आलेल्या ट्रीटमेन्ट बद्दल सांगायचं झालं अझरचं आय़ुष्य, त्याच्या जिवनातील अनेक उतार-चढाव जरी या सिनेमात रेखाटण्यात आले असतील तरी, या सगळ्या घटना किंवा त्यांचे इमोशन्स मनात भिडत नाही. सिनेमाचे संवादही हवे तितके इंफॅक्टफूल वाटत नाहीत.