फिल्म रिव्ह्यू : सत्य घटनेवर आधारीत 'अनारकली ऑफ आराह'

आज सिल्वर स्क्रिनवर स्वरा भास्कर स्टारर अविनाश दास दिग्दर्शित 'अनारकली ऑफ आराह' हा सिनेमा प्रदर्शित झालाय.

Updated: Mar 24, 2017, 04:58 PM IST
फिल्म रिव्ह्यू : सत्य घटनेवर आधारीत 'अनारकली ऑफ आराह' title=

सिनेमा : अनारकली ऑफ आराह

दिग्दर्शन : अविनाश दास

कलाकार : स्वरा भास्कर, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी, इश्तियाक खान

जयंती वाघधरे, मुंबई : आज सिल्वर स्क्रिनवर स्वरा भास्कर स्टारर अविनाश दास दिग्दर्शित 'अनारकली ऑफ आराह' हा सिनेमा प्रदर्शित झालाय.
 
'अनारकली ऑफ आराह'चे दिग्दर्शक अविनाश दास यांचा हा डेब्यू सिनेमा आहे. बिहारमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. अनारकलीची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं... जी या सिनेमात एक स्टेज परफॉर्मर आहे. डबल मिनिंग गाणी गाऊन ती लोकांचं मनोरंजन करताना दिसते... 

एकदा स्वरा स्टेजवर परफॉर्म करत असताना, शहातल्या ट्रस्टी धर्मेंद्र चौहानची तिच्यावर नजर पडते, जी भूमिका साकारली आहे अभिनेता संजय मिश्रानं... त्याची नियत बरी नसल्यामुळे अनारकली त्याला चांगलाच धडा शिकवते. पण या सगळ्या गोष्टींची परतफेड अनारकलीलाच करावी लागते... यानंतर काय घडतं या साठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल.

स्वरानं साकारलेली अनारकली छान झालीय. तिच्या भूमिकेला तिनं पूर्ण न्याय दिलाय. अभिनेता संजय मिश्रा आणि पंकज मिश्रा या दोघांनीही आपापल्या व्याक्तिरेखा प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत.