प्रत्युषा बॅनर्जीवर येणार चित्रपट

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं काही दिवसांपूर्वी आपल्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

Updated: Apr 18, 2016, 09:50 PM IST
प्रत्युषा बॅनर्जीवर येणार चित्रपट title=

मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं काही दिवसांपूर्वी आपल्या मुंबईतल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाचं गूढ अजूनही उकलेलं नाही, पण प्रत्युषा बॅनर्जीच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट येणार आहे. 

या चित्रपटामध्ये दक्षिण भारतातली अभिनेत्री तनिषा प्रत्युषाची भूमिका करेल, तसंच हर पल है धोखा असं या चित्रपटाचं नाव असेल, असं बोललं जात आहे. तनिषानं बॉलीवूडमध्ये नुकताच तेरी फितरत नावाचा चित्रपट पूर्ण केला आहे. 

प्रत्युषावरच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मुकेश नारायण अग्रवाल करणार आहेत, तसंच ग्रीन लीव्हस स्टार इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि सुधा फिल्म्स या बॅनरखाली हा चित्रपट बनेल अशी माहिती मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रत्युषाचा बॉयफ्रेंड असलेल्या राहुल राज सिंगचा रोल श्रवण राघव करणार आहे.