'नापाक' ए आर रहेमानविरुद्ध निघाला फतवा!

प्रसिद्ध म्युझिक कंम्पोझर ए. आर. रहेमान सध्या अडचणीत सापडलेत.  सिनेनिर्माते माजिद मजीदी यांच्या सिनेमाला संगीत दिल्यानंतर माजिद आणि रहेमान हे दोघेही 'नापाक' झाल्याचं एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं म्हटलंय... तसंच त्यांच्याविरुद्ध एक फतवाही काढण्यात आलाय. 

Updated: Sep 11, 2015, 03:56 PM IST
'नापाक' ए आर रहेमानविरुद्ध निघाला फतवा! title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध म्युझिक कंम्पोझर ए. आर. रहेमान सध्या अडचणीत सापडलेत.  सिनेनिर्माते माजिद मजीदी यांच्या सिनेमाला संगीत दिल्यानंतर माजिद आणि रहेमान हे दोघेही 'नापाक' झाल्याचं एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं म्हटलंय... तसंच त्यांच्याविरुद्ध एक फतवाही काढण्यात आलाय. 

माजिद मजीदी यांचा सिनेमा 'मोहम्मद : द मॅसेंजर ऑफ गॉड' हा सिनेमातून मुस्लिमांच्या धार्मिक भावनांना दुखावल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. याच सिनेमात संगीत दिल्यानं रहेमान यांना 'नापाक' करार देण्यात आलंय. हा सिनेमा ईरानचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा समजला जातोय.

अधिक वाचा - ए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

या संघटनेच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद साहब यांच्यावर कोणताही सिनेमा काढला जाऊ शकता नाही किंवा त्यांची प्रतिकृती तयार केली जाऊ शकत नाही. हा सिनेमा इस्लाम धर्माची टर उडवतोय. इतकंच नाही तर, या संघटनेच्या म्हणण्यानुसार, या सिनेमात काही प्रोफेशनल अभिनेत्यांनीदेखील काम केलंय... यातील बहुतेक जण मुस्लिम नाहीत... आणि त्यामुळेच या सिनेमात काम करणारे विशेषत: ए. आर. रहेमान आणि मजीदी दोघंही 'नापाक' झालेत. या दोघांनीही पुन्हा 'पाक' होण्यासाठी कलमा वाचन आवश्यक असल्याचा त्यांनी फतवाच काढलाय. 

अधिक वाचा - ए. आर. रेहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा

उल्लेखनीय म्हणजे केवळ हीच संघटना नाही तर इतर अरब देशांतही या सिनेमावरून वादंग निर्माण झालाय. सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना अल-अजहरदेखील या सिनेमावरून नाराज असल्याचं समजतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.