मुंबई : २०१६ या वर्षाची सुरुवात अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या ब्रेकअसोबत झाली. कॅटरिना आणि रणबीर यांचा ब्रेकअप, जॉन अब्राहीम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल याचा विवाह तुटल्याची चर्चा सगळीकडेच होती.
बॉलीवूडचा मोस्ट टॅलेंटेड अॅक्टर फरहान खान आणि अधूना यांचा विवाह तुटल्याची चर्चा ही अधिक रंगली पण त्यानंतर चर्चा रंगली ती श्रद्धा कपूर हिच्यामुळे दोघांचं लग्न तुटलं.
श्रद्धा कपूर हिच्यामुळे लग्न तुटल्याची चर्चा आता थांबली पण अदिती राव हैदरीचं नाव या चर्चेत आलं. अदिती राव आणि फरहान यांच्यामध्ये जवळीकता वाढल्यामुळे फरहान आणि अधूना यांच्यात भाडणं होत होती. फरहान खानने जेव्हा करण जोहरच्या पार्टीमध्ये अदिती रावसोबत एंट्री केली त्यावेळेस अधूनाने फरहानसोबत संबंध तोडण्याचं ठरवलं.