सेक्स स्कँडलमध्ये अडकलेली अभिनेत्री करण जोहरच्या सिनेमात झळकणार

मॉडेल श्वेता प्रसाद बासू ही लवकरच करन जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट आणि वरुन धवन यांचा ही रोल असणार आहे. 

Updated: Apr 12, 2016, 05:03 PM IST
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेली अभिनेत्री करण जोहरच्या सिनेमात झळकणार  title=

नवी दिल्ली : मॉडेल श्वेता प्रसाद बासू ही लवकरच करन जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट आणि वरुन धवन यांचा ही रोल असणार आहे. 

श्वेताला एकता कपूरने तिची सिरीयल चंद्रगुप्त मौर्यासाठी देखील साईन केलं आहे. लवकरच या सिरीयलची शुटींग सुरु होणार आहे. याची माहिती श्वेताचे वडील अनुज प्रसाद यांनी दिली आहे. 

२०१४ मध्ये हैदराबादमधील बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेताचं नाव आलं होतं. २ महिने रेस्क्यू होममध्ये श्वेता होती त्यानंतर तिला सेशन कोर्टाने क्लिन चिट दिली होती. त्यानंतर तिने सर्व आरोप फेटाळले होते. २००२ मध्ये मकडी या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.