'एक विलन' सुपरहिट, आठवड्यात 50 कोटींच्या घरात

चित्रपटाची कथा आणि अभिनयाची चित्रपट समीक्षकांनी वाह...वाह... केल्यानंतर, आठवड्याच्या शेवटी 'एक विलन' सिनेमाची कमाई 50 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 

Updated: Jun 30, 2014, 07:56 PM IST
'एक विलन' सुपरहिट, आठवड्यात 50 कोटींच्या घरात  title=

मुंबई : चित्रपटाची कथा आणि अभिनयाची चित्रपट समीक्षकांनी वाह...वाह... केल्यानंतर, आठवड्याच्या शेवटी 'एक विलन' सिनेमाची कमाई 50 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 

व्यापार विश्लेषक तरण आदर्श याने ट्विटरच्या माध्यमातून 'एक विलन'च्या कमाईची माहिती दिलीय. तरणने ट्विट केलय की, 2014 मध्ये 'जय हो' नंतर 'एक विलन' चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरलाय. 

सिध्दार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर,आणि रितेश देशमुख यांच्या 'एक विलन'ने 50.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसंच सलमान खानचा जय हो ने पहिल्या आठवड्यात 60.68 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

#EkVillain Fri 16.72 cr, Sat 16.54 cr, Sun 17.44 cr. Total: ₹ 50.70 cr nett. India biz. MONSTROUS HIT!

— taran adarsh (@taran_adarsh) June 30, 2014

#EkVillain is the SECOND BIGGEST weekend grosser of 2014. Here's the list of Top 10 openers of 2014 [so far]... http://t.co/sV5g7ueONm

— taran adarsh (@taran_adarsh) June 30, 2014

बालाजी मोशन पिक्चर्सची फिल्म 'एक विलन' 27 जूनला 2,539 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आली होती. सिनेमानी शुक्रवारी 16.72 कोटी रुपये, शनिवारी 16.53 कोटी रुपये आणि रविवारी 17.44 कोटी रुपयांची कमाई केलीय. 

चित्रपटाच्या यशाविषयी बोलताना दिग्दर्शक मोहित सूरी म्हणाला की, 'माझ्या स्वतःच्या कंपनीतून रिलीज झालेली ही पहिली फिल्म आहेय आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे'. 

मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाची गाणी प्रेषकांच्या मनात बसली होती. अपेक्षित आहे की,'एक विलन' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये शामिल होईल.जर असं झालं तर 2014 च्या कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारी ही चौथी फिल्म असेल. 

2014 साली आता पर्यत 111.25 कोटी केलेला 'हॉलिडे', त्यानंतर 111 कोटी कमाई केलेला 'जय हो' आणि 104 कोटी रुपये कमाई झालेला 'टू स्टेटस' या फिल्मस आधीच 100 कोटीच्या क्लब मध्ये समाविष्ठ आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.