'एक व्हिलन'नं अनेक दरवाजे उघडले -रितेश देशमुख

बॉक्स ऑफिसवर जोरोशोरोत सुरु असणाऱ्या 'एक व्हिलन' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसलाय... या भूमिकेला हृतेशनं चार चाँद लावलेत. 

Updated: Jul 2, 2014, 10:23 PM IST
'एक व्हिलन'नं अनेक दरवाजे उघडले -रितेश देशमुख title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर जोरोशोरोत सुरु असणाऱ्या 'एक व्हिलन' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसलाय... या भूमिकेला रितेशनं चार चाँद लावलेत. 

रितेशच्या याच भूमिकेची सध्या बॉलिवूड वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रितेशचाही यामुळे आत्मविश्वास दुणावलाय. 'या चित्रपटाचं यश आणि यातील भूमिका मला एक अभिनेता म्हणून नव्या क्षितीजावर घेऊन जाईल' असं रितेशनं म्हटलंय. 

'एक व्हिलन' हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सिनेमा ठरलाय. याच सिनेमातील नकारात्मक भूमिकेमुळे माझ्यासाठी इतर अनेक दरवाजे उघडले जातील' अशी आशाही रितेशनं यावेळी व्यक्त केलीय. 

याआधी रितेश काही विनोदी भूमिकांतून समोर आला होता. 'मी यापूर्वी ज्या विनोदी भूमिका केल्या, त्याहून हटके अशी भूमिका मला करायचीय... मात्र, तरीही मी यापुढे विनोदी भूमिका नक्कीच साकारणार' असंही रितेशनं म्हटलंय.  

'एक व्हिलन'च्या यशानंतर रितेशनं चित्रपटातील आपल्या सहकलाकारांसाठी पार्टी आयोजित केली होती. यावेळी, दिग्दर्शक मोहित सुरी, सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर ही उपस्थित होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.