मुंबई : मुंबईचे पोलीस उपायुक्त सुनील पारसकर आणि मॉडेल लैंगिक शोषण प्रकरणात पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या पूनम पांडेनं मात्र आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आपले हात झटकलेत.
सुनील पारकसर कोण हेही मला माहीत नाही, असं पूनम पांडेनं म्हटलंय. झी मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत पुनमनं ‘मी अशा कोणत्याही पीडित मॉडेलला ओळखतदेखील नाही... मी कधी तिला भेटलेदेखील नाही... आणि माझं नाव या प्रकरणात कसं आलं हेदेखील मला माहीत नाही’ असा दावा केलाय.
‘मुंबईच्या मीरा रोड केसमध्ये काहीही नव्हतं... मी फक्त माझ्या भावासोबत मोठ्या आवाजात म्युझिक लावून फिरत होते आणि पोलीस आपलं काम करत होते... आणि ते प्रकरण काही इतकं मोठंदेखील नव्हतं की मला कुणाच्या मदतीची गरज लागेल’ असंही स्पष्टीकरण पूनमनं म्हटलंय.
पूनमला रिअॅलिटी शो बीग बॉसमध्ये जाण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तीचं म्हणणं होतं, बीग बॉसमध्येच जायचं असतं तर मी दोन वर्षांपूर्वीच गेले असते. मला हा शो खूप आवडतो पण मलाच बीग बॉसमध्ये जायची इच्छा नाही.
‘मला कित्येक लोकांचे कॉल आलेत. बीग बॉससंबंधी अनेक जण मला प्रश्न विचारत आहेत... तर अशा सगळ्यांसाठी मी सांगू इच्छिते की मी कधीही एका घरात बंद होऊन राहू शकत नाही... आणि म्हणूनच मी बीग बॉसमध्ये जाणार नाही’ असंही तीनं म्हटलंय.
अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पूनम आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहतेय. एकदा का माझं नाव या प्रकरणातून बाहेर झालं की मी मानहानीची केस दाखल करेन, असंही तिनं आता म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.