'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची गिनिज बुकमध्येही नोंद

शाहरुख खान- काजोलच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाला आज मराठा मंदिरमध्ये 1000 आठवडे पूर्ण होत आहेत. डिडिएलजीची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात येणार आहे.

Updated: Dec 12, 2014, 04:38 PM IST
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची गिनिज बुकमध्येही नोंद  title=

मुंबई : शाहरुख खान- काजोलच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाला आज मराठा मंदिरमध्ये 1000 आठवडे पूर्ण होत आहेत. डिडिएलजीची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात येणार आहे.

हा सिनेमा 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. डिडिएलजे हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरला होता. सलग 1000 आठवडे मराठा मंदिरमध्ये चालण्याचा आगळा-विक्रम डिडिएलजेने केली असून याची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात येणार आहे..तरुणाईमध्ये आजही डिडिएलजेची क्रेझ कायम आहे.

दरम्यान,शाहरुख खान आणि काजोलनं या सिनेमाचा ट्रेलर आणि काही एडिटेड सीन्स ज्यांच्या सिनेमात समावेश केला गेला नव्हता असे सीन्स दर्शकांना गिफ्ट म्हणून जाहीर केलेत. 'डीडीएलजे'चा हा ट्रेलरही दर्शकांकडून खूप पसंत केला जातोय. यू-ट्यूबवर या व्हिडिओला आत्तापर्यंत साडेतीन लाखांहून जास्त हिटस् मिळाल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.