'दिल दोस्ती दोबारा' 18 फेब्रुवारीपासून

ी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

Updated: Jan 29, 2017, 11:27 PM IST
'दिल दोस्ती दोबारा' 18 फेब्रुवारीपासून  title=

मुंबई : झी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या मालिकेवर भरभरुन प्रेम केले होते. या मालिकेतील आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते.

लिमिटेड एपिसो़डची ही मालिका होती. त्यानंतर ही मालिका संपली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 'दिल दोस्ती दोबारा' हे या सिक्वलचं नाव असणार आहे. 18 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेचा प्रोमो झी मराठीनं शेअर केला आहे.

पाहा 'दिल दोस्ती दोबारा' चा प्रोमो