धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडचा होणार खुलासा...

भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनवला जातोय. ‘एमएस धो नीः द अनटोल्ड स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव असून सुशांत राजपूत धोनीच्या भूमिकेत आहे. या सिनेमात धोनीच्या जीवनातील अशा काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत ज्या अजूनपर्यंत त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत.

Updated: Mar 21, 2015, 04:17 PM IST
धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडचा होणार खुलासा...  title=

मुंबई : भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनवला जातोय. ‘एमएस धो नीः द अनटोल्ड स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव असून सुशांत राजपूत धोनीच्या भूमिकेत आहे. या सिनेमात धोनीच्या जीवनातील अशा काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत ज्या अजूनपर्यंत त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत.

सिनेमात धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या विषयीच्या काही गोष्टींचाही उलगडा करण्यात आलाय. तशी परवानगीही धोनीकडून घेण्यात आलीय, असं दिग्दर्शक निरज पांडे यांनी स्पष्ट केलंय. 

धोनीची एक्स-गर्लफ्रेंड धोनीला सोडून गेली होती... तोपर्यंत धोनीचं क्रिकेट विश्वात काहीच नाव नव्हतं... मात्र, काही काळानंतर धोनीला मिळालेलं यश पाहून तिला पुन्हा धोनीच्या आयुष्यात परतण्याची इच्छा होती... मात्र, धोनीनं तिला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, धोनीची ही एक्स गर्लफ्रेंड आत्ता मात्र या जगात नाही.
 
या मुलीच्या भूमिकेसाठी एका नविन चेहऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती सिनेमाच्या निर्मात्यांनी दिलीय. सिनेमात धोनीची पत्नी साक्षी हिचीही भूमिका महत्त्वाची आहे. धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर साक्षीची त्याच्या जीवनात झालेली एन्ट्री सिनेमातूनही प्रेक्षकांच्यासमोर येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.