मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन झालेय. मुंबई मिररच्या बातमीनुसार ३० जानेवारीला तिच्या आजोबांचे निधन झालेय.
दीपिका सध्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या शूटिंगमधून ती ब्रेक घेत या दुख:दसमयी कुटुंबाला वेळ देणार आहे.
काही दिवसांपासून पद्मावती चित्रपटावरुन वादंग सुरु आहेत. पद्मावती प्रकरणात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विटवरुन दीपिकाने आपले मत व्यक्त केले होते. तिने ट्विटमध्ये असे म्हटले होते की, एका साहसी आणि शूर महिलेची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणण्याच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.