Confirmed list:'बिग बॉस ९'मधील स्पर्धकांची नावं!

नेहमीच वादात असणारा रिअॅलिटी शो बिग बॉसचा नववा सिझन आजपासून सुरू होतोय. यावेळी डबल-ट्रबल ही थीम आहे. बिग बॉसच्या घरात कोण-कोणते सेलिब्रेटी राहणार आहेत याबाबत नेहमीच उत्सुकता असते. सर्व रिअॅलिटी शोचा 'बाप' असणाऱ्या या शोमध्ये कोण स्पर्धक असणार ते पाहा.

Updated: Oct 11, 2015, 06:34 PM IST
Confirmed list:'बिग बॉस ९'मधील स्पर्धकांची नावं! title=

मुंबई: नेहमीच वादात असणारा रिअॅलिटी शो बिग बॉसचा नववा सिझन आजपासून सुरू होतोय. यावेळी डबल-ट्रबल ही थीम आहे. बिग बॉसच्या घरात कोण-कोणते सेलिब्रेटी राहणार आहेत याबाबत नेहमीच उत्सुकता असते. सर्व रिअॅलिटी शोचा 'बाप' असणाऱ्या या शोमध्ये कोण स्पर्धक असणार ते पाहा.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान बिग बॉस-९चं होस्टिंग करणार आहे. सलमानसाठीही लोणावळ्यात एक बंगला बांधण्यात आलाय. बिग बॉसच्या सेटच्या शेजारीच. 

आणखी वाचा - 'प्रश्नासाठी टाळ्या... भावनिक प्रश्न' ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नावर सलमानचं उत्तर

स्पर्धेकांची नक्की नावं आमच्या हाती आली आहेत. आज काही तासांनी शो सुरू होणार आहे. त्यापूर्वीच पाहा स्पर्धकांची नावं. 

अंकित गेरा
'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेतील अभिनेता अंकित गेरा आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड रूपल त्यागी बिग बॉसच्या घरात असतील. 

रूपल त्यागी
'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेत अभिनेत्रीच्या भूमिकेत असलेली रूपल त्यागी बिग बॉसच्या घरात असेल. यापूर्वी 'झलक दिखला जा'च्या शोमध्ये ती अंकित गेरासोबत होती. आता दोघांचं ब्रेक अप झालंय. त्यामुळं या दोघांची बिग बॉसच्या घरातील केमेस्ट्री पाहण्यासारखी असेल.

अमन वर्मा
भारतीय टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अमन वर्मा नेहमीच चर्चेत असतो. एकेकाळी टिव्हीवर राज्य गाजवणारा अमन सध्या लाइमलाईटपासून दूर आहे. पण आता बिग बॉसच्या घरात त्याचं नवं रूप पाहायला मिळेल.

रोचेल मारिया राव
मॉडेल, अभिनेत्री असलेली रोचेल २०१२ फेमिना मिस इंडिया या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची विजेती होती. २०१३मध्ये आयपीएलचं तिनं होस्टिंगही केलं. बिग बॉसच्या डबल ट्रबलमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड मॉडेल-अॅक्टर कैथ सेक्वेरिया सोबत दिसेल.

कैथ सेक्वेरिया 
मॉडेलिंग क्षेत्रात कैथचा चेहरा ओळखीचा आहे. त्यानं अनेक शो होस्ट सुद्धा केलेत. शिवाय काही चित्रपटांमध्येही त्यानं काम केलंय. वेगळाच रोमान्स यावेळी बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल.

किश्वर मर्चंट
किश्वर मर्चंट टिव्हीवरील प्रसिद्ध चेहरा बिग बॉसच्या घरात असेल याबाबत अफवा पसरलीय. कदाचित किश्वर सुयश राय आपल्या बॉयफ्रेंडसोबत बिग बॉसच्या घरात दिसेल.

सुयश राय
आतापर्यंत आपल्याला कळलंच असेल डबल-ट्रबल या यंदाच्या बिग बॉसच्या सिझनमध्ये कपल्स दिसणार आहेत. काही सध्याचे कपल्स आणि एक्स कपल्स... सुयश राय अभिनेता-गायक 'प्यार की ए एक कहानी' चित्रपटात आपल्याला दिसला. गर्लफ्रेंड किश्वर रायसोबत आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसू शकेल. 

आणखी वाचा - Confirmed! Bigg Boss 9 दिसणार ११ ऑक्टोबरपासून

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.