चला हवा येऊ द्यातील श्रेया बुगडेने केला टॅटू....

 सध्या हिंदी सोबत मराठी तारकांही टॅटूच्या प्रेमात आहेत. मराठीत ग्लॅमरस सई ताम्हाणकर हिचा टॅटू गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. पण आता चला हवा येऊ द्या तील श्रेया बुगडेचा टॅटूची सध्या चर्चा आहे. 

Updated: Dec 1, 2016, 06:52 PM IST
 चला हवा येऊ द्यातील श्रेया बुगडेने केला टॅटू.... title=

प्रशांत अनासपुरेसह प्रशांत जाधव, झी मीडिया, मुंबई :  सध्या हिंदी सोबत मराठी तारकांही टॅटूच्या प्रेमात आहेत. मराठीत ग्लॅमरस सई ताम्हाणकर हिचा टॅटू गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. पण आता चला हवा येऊ द्या तील श्रेया बुगडेचा टॅटूची सध्या चर्चा आहे. 

श्रेया बुगडे हिने उजव्या हातावर एक टॅटू काढला आहे.  'आराध्य' नावाचा हा टॅटू असून देवनागरी लिपीत हा टॅटू काढण्यात आला आहे. आराध्यच्या शेवटच्या अक्षरात तीने गणपती काढलेला आहे.  

श्रेया बुगडेच्या भाच्याचे नाव आराध्य आहे. त्याचा जन्म झाल्यावर त्याचे नाव ठेवण्यात आले. तेव्हा तिने हा टॅटू काढला आहे. आज  तिचा भाचा पाच वर्षाचा आहे आणि हा टॅटूही पाच व

श्रेया हिची गणपतीवर श्रद्धा आहे. त्यामुळेच तिने हा टॅटू काढला असावा अशी चर्चा आहे. 


सई ताम्हणकर । तेजस्विनी पंडित । मानसी नाईक यांचे टॅटू

सई ताम्हणकरचे तीन टॅटू...

सई ताम्हणकरच्या पाठीवर, उजव्या हातावर, डाव्या हाताच्या बोटावर टॅटू काढण्यात आले आहे. 

मानसी नाईकचा टॅटू 

आपल्या नृत्याने घायाळ करणारी  मानसी नाईकने कंबरेवर एक काळी मांजर चंद्राच्या चकोरावर जाऊन बसली आहे असा टॅटू काढला आहे.  मांजरीच्या गळ्यात डायमंड आहे आणि चंद्राच्या चकोरात हार्ट आहेत. 

 तेजस्विनी पंडितचे तीन टॅटू...  

 तेजस्विनी पंडितने तिच्या अंगावर तीन टॅटू गोंदविले आहेत. तेजस्विनीने पायावर छोट्या डेविलचा टॅटू गोंदवून घेतला होता. हातावर तिने नवऱ्याचे नाव काढले आहे. तेजस्विनीचे बाबा गेल्यानंतर त्यांच्या आठवणीत तिने बोटावर ‘बाबा’ या अक्षराचा टॅटू काढला आहे.

प्राजक्ता माळीचा टॅटू...

 अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील तिच्या उजव्या हातावर ‘ओशो’ नावाचा टॅटू काढला आहे.