मुंबई : बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
अभिनेता सलमान खान, अभिनेत्री काजोल आणि माधुरी दीक्षित आदींसोबत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. रिमा यांच्या अचानक जाण्याने सिनेमा क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘आई शप्पथ’, ‘बिंधास्त’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’ यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
त्यांना ‘मैने प्यार किया’ (१९९०), ‘आशिकी’ (१९९१), ‘हम आपके है कौन’ (१९९५) आणि ‘वास्तव’ (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी फिल्म फेअरमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
त्यांची प्रमुख नाटके
- घर तिघांचं हवं
- चल आटप लवकर
- झाले मोकळे आकाश
- तो एक क्षण
- पुरुष
- बुलंद
- सविता दामोदर परांजपे
- विठो रखुमाय
- सौजन्याची ऐशी तैशी
- शांतेचे कार्ट चालू आहे