मुंबई : गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचं आज निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. आज कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
- घर तिघांचं हवं
- चल आटप लवकर
- झाले मोकळे आकाश
- तो एक क्षण
- पुरुष
- बुलंद
- सविता दामोदर परांजपे
- विठो रखुमाय
- सौजन्याची ऐशी तैशी
- शांतेचे कार्ट चालू आहे
सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचे कार्ट चालू आहे या नाटकांनंतर आता सुलभा देशपांडे, रिमा लागू आणि लालन सारंग यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्याला भरभरून दाद मिळाली. हे नाटक प्रचंड गाजले होते. पुरुषी अहंकारासमोर स्त्रीची होणारी कुचंबना या नाटकात मांडण्यात आली होती. या नाटकाचे लेखन गंगाराम गवाणकर यांनी केले होते.
तसेच पुत्रकामेष्ठी, स्वामी समर्थ, रेशीमगाठी, समांतर यांसारख्या मराठी तर साहब बीबी और टीव्ही आणि गुब्बारे अशा हिंदी मालिकांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. सुलभा देशपांडे, रिमा लागू आणि लालन सारंग यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.