बिपाशा-करणच्या लग्नाची तारीख ठरली

गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतायत. येत्या ३० एप्रिलला हे दोघेही विवाहबंधनात अडकत असल्याची चर्चा आहे. 

Updated: Mar 29, 2016, 03:35 PM IST
बिपाशा-करणच्या लग्नाची तारीख ठरली title=

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतायत. येत्या ३० एप्रिलला हे दोघेही विवाहबंधनात अडकत असल्याची चर्चा आहे. 

या दोघांच्या नात्याला बिपाशा आणि करणच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र आता दोघांच्या घरच्यांनी संमती दिल्याचे बोलले जातेय. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा मार्गही मोकळा झालाय. 

एका ऑनलाईन पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिलला हे दोघे लग्न करण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत बिपाशा अथवा करणकडून कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही.