बॉलीवूडने मला चित्रपटात काय नाही करायचे हे शिकवले - नागराज

सैराट या चित्रपटाला राज्यातून तसेच राज्याबाहेरही अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या यशाने दिग्दर्शक नागराज मंजुळे खूप खुश आहेत. सैराटला यश मिळेल हे माहीत होते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया खुद्द नागराज यांनी दिलीये.

Updated: May 19, 2016, 12:55 PM IST
बॉलीवूडने मला चित्रपटात काय नाही करायचे हे शिकवले - नागराज title=

मुंबई : सैराट या चित्रपटाला राज्यातून तसेच राज्याबाहेरही अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या यशाने दिग्दर्शक नागराज मंजुळे खूप खुश आहेत. सैराटला यश मिळेल हे माहीत होते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया खुद्द नागराज यांनी दिलीये.

बॉलीवूडमधील 'कयामत ते कयामत तक' आणि 'एक दुजे के लिये' या चित्रपटातून सैराटची प्रेरणा मिळाली का असे विचारले असता त्यांनी ते नाकारले. याउलट बॉलीवूड चित्रपटांनी मला चित्रपटात काय करु नये हे शिकवल्याचे नागराज यांनी सांगितले. 

एका रिपोर्टनुसार या चित्रपटाचे बजेट ४ कोटी रुपयाचे असल्याचे बोलले जात आहे. त्या तुलनेत या चित्रपटाने ५५ कोटींहूनही अधिकाची कमाई केलीये. मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरलाय. 

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. हे खरंच मला अपेक्षित नव्हतं. चित्रपटाला यश मिळेल हे माहीत होत. मात्र इतकं मिळेल याचा विचारही केला नव्हता. आमिर खान, इरफान खान यासारख्या कलाकारांनी सैराटबद्दल केलेले ट्विट माझ्यासाठी मोठे आहेत, असे नागराज यांनी यावेळी सांगितले. यावेळी सैराटच्या त्यांनी अनेक आठवणीही सांगितल्या.