दिलीप कुमार हाजीर हो!

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना वयाच्या ९४ व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. 

Updated: Feb 23, 2016, 10:30 AM IST
दिलीप कुमार हाजीर हो! title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना वयाच्या ९४ व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. 

मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने १८ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात दिलीप कुमार यांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दिलीपकुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिलीय. वयाच्या ९४ व्या वर्षी तब्येत नाजूक असतानाही दिलीप साहेब कोर्टात हजर राहतील, असं सायराबानू ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.  

 

मुंबईच्या पाली हिल या परिसरात दिलीप कुमार यांची प्रॉपर्टी आहे. त्यावरुन दिलीपकुमार आणि त्यांच्या दोन भावांमध्ये वाद आहे. त्यासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिलीप कुमार यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.