बिग बॉस 9 : मंदनानं किश्वरला लाथ मारली आणि...

बिग बॉस 9 - डबल ट्रबलच्या 31 व्या भागात मंदना आणि किश्वर यांच्या भांडणाचं पर्यावसण हाणामारीत झालं.

Updated: Nov 11, 2015, 11:30 PM IST
बिग बॉस 9 : मंदनानं किश्वरला लाथ मारली आणि... title=

मुंबई : बिग बॉस 9 - डबल ट्रबलच्या 31 व्या भागात मंदना आणि किश्वर यांच्या भांडणाचं पर्यावसण हाणामारीत झालं.

टीम ए आणि टीम बी अशा दोन गटांत 'हायवे टास्क' सुरू असताना हा प्रकार घडला. 'टीम बी'चे सदस्य रिक्शामध्ये बसले असताना त्यांना त्रास देण्यासाठी 'टीम ए'च्या सदस्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. 

'टिम ए'च्या प्रिन्स आणि किश्वरनं रिक्शात बसलेल्या मंदनाच्या अंगावर थंड पाणी ओतलं. तिचा माईक वाचवण्यासाठी आलेल्या किश्वरला मंदनानं लाथ मारल्याचा आरोप किश्वरनं केला. त्यानंतर संतापलेल्या किश्वरनं माईक फेकून देत आपण ही टास्क पुढे खेळणार नसल्याचं सांगितलं.

हा सगळा गंमतीचा खेळ विचित्र रुपात समोर आल्यानं बिग बॉसनं हा खेळ इथंच थांबवण्यात येत असल्याचं जाहीर केलं... आणि मंदनाला पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेटही केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x