'बिग बॉस'मधून सलमाननं घेतली सुट्टी!

२७ डिसेंबर... हा अभिनेता सलमान खानचा वाढदिवस. यंदा तो ५० वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सलमान खाननं 'बिग बॉस'ला डिच्चू दिलाय, असं तुम्हाला वाटत असेल... पण तसं नाही.

Updated: Dec 25, 2015, 10:33 AM IST
'बिग बॉस'मधून सलमाननं घेतली सुट्टी! title=

नवी दिल्ली : २७ डिसेंबर... हा अभिनेता सलमान खानचा वाढदिवस. यंदा तो ५० वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सलमान खाननं 'बिग बॉस'ला डिच्चू दिलाय, असं तुम्हाला वाटत असेल... पण तसं नाही.

सलमाननं बिग बॉसमधून सुट्टी घेतल्यानं तो या विकेन्डला शुटींगवर नसेल... पण तरीही तो विकेन्डच्या भागात प्रेक्षकांना दिसेल. 

कारण, विकेन्डवर होणाऱ्या भागाची शुटींग नेहमी शनिवारी होतं. परंतु, या विकेन्डला एक दिवस अगोदरच सलमान या भागाचं शुटींग करणार आहे. 

सलमान आपला वाढदिवस आपल्या खास मित्रांसोबत सेलिब्रिट करणार आहे. पनवेलच्या फार्महाऊसवर हे सेलिब्रेशन कदाचित होऊ शकेल. 

सलमानचा वाढदिवस खास बनवण्यासाठी बिग बॉसनंही खास तय्यारी केलीय. यासाठी घरातल्या सदस्यांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. या भागात सनी देओलही आपल्या आगामी 'घायल वन्स अगेन' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल होणार आहे.