भास्कर जाधवांची सैराट सिनेमावर टीका

सैराट सिनेमा महाराष्ट्रात चांगलाच गाजला पण

Updated: Jul 20, 2016, 10:13 PM IST
भास्कर जाधवांची सैराट सिनेमावर टीका title=

मुंबई : सैराट सिनेमा महाराष्ट्रात चांगलाच गाजला. अनेकांनी सिनेमाचं कौतूक केलं पण प्रत्येक गोष्टीला विरोधकही असतातच. सैराट सारख्या काही चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून समाजात जातीय व्देष पेरण्याचे आणि जातीय दरी निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचं जातीय वैमनस्यावर भाष्य करतांना राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

एखाद्या समाजाला टार्गेट करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय अशा गोष्टींकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे असं देखील राष्ट्रवादी  भास्करराव जाधव यांनी म्हटलं आहे.