'बजरंगी भाईजान' विरुद्ध 'बाहुबली', कोण जिंकणार बॉक्स ऑफिसचा लढा?

सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि प्रभाषचा बाहुबली दोन्ही चित्रपटांनी कमाईत जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केलाय. पण बॉक्स ऑफिसवर कोणाचं वर्चस्व राहणार... चला जाणून घेऊ...

Updated: Aug 9, 2015, 04:34 PM IST
'बजरंगी भाईजान' विरुद्ध 'बाहुबली', कोण जिंकणार बॉक्स ऑफिसचा लढा? title=

मुंबई: सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि प्रभाषचा बाहुबली दोन्ही चित्रपटांनी कमाईत जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केलाय. पण बॉक्स ऑफिसवर कोणाचं वर्चस्व राहणार... चला जाणून घेऊ...

एस. एस. राजमौली यांचा बाहुबली १० जुलैला रिलीज झाला. भारतीय सिनेमाला जगभरात एवढं ओपनींग कधी मिळालं नव्हतं जे बाहुबलीला मिळालं. बाहुबलीनं इतिहास रचला. आतापर्यंतचा तो बिग बजेट सिनेमा ठरला. तर दुसरीकडे सल्लू मियाँचा बजरंगी भाईजान ईदच्या पार्श्वभूमिवर बॉक्स ऑफिसवर धडकला. आपल्या दमदार परफॉर्मन्स आणि भावनिक कथेमुळे भारतीय बाजारात ३०० कोटींचा गल्ला बजरंगीनं कमवला. 

२०१५ वर्षातील पहिले सहा महिने हे १०० कोटींच्या कमाईचे झाले. तनु वेड्स मनू रिटर्न्स, ABCD 2 हे हिट ठरले. तर अनेक चित्रपट कमाईच्या बाबतीत गडबडले. 

मात्र जुलै महिना बाहुबली आणि बजरंगी भाईजान घेऊन आले.  दोन्ही चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत इतिहास रचलाय. दोन्ही चित्रपट मिळून तब्बल १००० कोटींची कमाई फिल्म इंडस्ट्रीला झालीय.  

बाहुबली वि. बजरंगी भाईजान
- बाहुबलीचं बजेट २५० कोटींचं होतं तर बजरंगी भाईजान ७५ कोटींमध्ये तयार झाला. 
- दोन्ही चित्रपट जवळपास सारख्या स्क्रीन्सवर रिलीज झाले. ५००० थिएटरमध्ये एकाचवेळी हे चित्रपट रिलीज झाले.
- बाहुलबी रिलीज होऊन २८ दिवस होऊन गेलेत तर बजरंगीचे तीन आठवडे पूर्ण झाले. बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनने १०० कोटींची कमाई केलीय. तर बजरंगीने ३०० कोटींचा गल्ला जमवला. 
- आतापर्यंत बजरंगी भाईजाननं जगभरात ५५० कोटींची कमाई केलीय. तर बाहुबलीनं ५१५ कोटी कमावलेत. अवघ्या ३५ कोटींनी बाहुबली बजरंगीच्या मागे आहे. 

जगभरात बाहुबली कमाईत बजरंगीच्या मागे असला तर देशात कमाईत बाहुबली पुढे आहे. त्यामुळे आता नक्की कोण अव्वल ठरणार हे पुढे येणारा काळ ठरवेल. पण दोन्ही चित्रपटांना पेक्षकांचं प्रेम सारखंच मिळतंय. हे नक्की!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.