कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी...

कपिल शर्माचे जर तुम्ही चाहते असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी अशी आहे.

Updated: Jun 19, 2016, 01:14 PM IST
कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी... title=

मुंबई : कपिल शर्माचे जर तुम्ही चाहते असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी अशी आहे.

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधून आता आणखी एक कलाकार बाहेर पडतोय. चंदन प्रभाकर उर्फ चंदू शोमधून बाहेर पडत असल्याचे वृत्त आहे. चंदन एकता कपूरच्या दी इंडियनमझाक लीगमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कपिल शर्माच्या कॉमेडी शोचे मेकर्स आणि दी इंडियनमझाक लीगचे मेकर्समध्ये काहीतरी बिनसल्याने चंदन शो सोडत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र या अफवा चंदनने फेटाळून लावल्यात.