आमिरच्या 'दंगल'शी 'बाहुबली'चा मुकाबला!

'बाहुबली २' प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच या सिनेमानं बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड ध्वस्त करून टाकले... 'बाहुबली २' प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वात जास्त कमाईचा रेकॉर्ड आमिर खानच्या 'दंगल'नं कायम केला होता... जवळपास ३८७ करोड रुपयांचं कलेक्शन या सिनेमानं केलं होतं. 'बाहुबली २'नं हा रेकॉर्ड अवघ्या काही दिवसांत तोडत नवा रेकॉर्डकडे वाटचाल सुरुच ठेवलीय. आत्तापर्यंत या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननं जवळपास ५०० करोडपर्यंत कमाई केलीय. 

Updated: May 23, 2017, 10:37 AM IST
आमिरच्या 'दंगल'शी 'बाहुबली'चा मुकाबला! title=

मुंबई : 'बाहुबली २' प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच या सिनेमानं बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड ध्वस्त करून टाकले... 'बाहुबली २' प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वात जास्त कमाईचा रेकॉर्ड आमिर खानच्या 'दंगल'नं कायम केला होता... जवळपास ३८७ करोड रुपयांचं कलेक्शन या सिनेमानं केलं होतं. 'बाहुबली २'नं हा रेकॉर्ड अवघ्या काही दिवसांत तोडत नवा रेकॉर्डकडे वाटचाल सुरुच ठेवलीय. आत्तापर्यंत या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननं जवळपास ५०० करोडपर्यंत कमाई केलीय. 

तर जागतिक पातळीवर या सिनेमानं १५६५ करोड रुपये अवघ्या २४ दिवसांत मिळवले आहेत. आत्तापर्यंत हा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. 

पण, थांबा... आमिरच्या 'दंगल'शी 'बाहुबली'चा मुकाबला थांबलेला नाही... याच दरम्यान, 'दंगल' चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आलाय. चीनमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी 'दंगल'नं जागतिक पातळीवर ७७० करोड रुपये कमाई केली होती. चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता 'दंगल'च्या कमाईचा आकडा १५०१ करोड रुपयांवर पोहचलाय. हा आकडा 'बाहुबली २'पेक्षा थोडासाच मागे आहे... 

'बाहुबली २'ची कमाई आता थोडी थंडावलीय.... त्यामुळे 'दंगल' 'बाहुबली'ला पछाडणार का? यावरही बरीच उत्सुकता निर्माण झालीय. अर्थात 'बाहुबली २' अजूनही काही देशांत प्रदर्शित होणं बाकी आहे.