कुठे हरवलीये ही आमिर-सलमानची हिरोईन?

बॉलीवूड असे जग आहे ज्या जगात कधी कोण चमकेल हे सांगता येत नाही. 

Updated: Aug 1, 2016, 01:21 PM IST
कुठे हरवलीये ही आमिर-सलमानची हिरोईन? title=

मुंबई : बॉलीवूड असे जग आहे ज्या जगात कधी कोण चमकेल हे सांगता येत नाही. या जगात तुम्ही जोपर्यंत प्रसिद्धीझोतात आहात तोपर्यंत तुम्हाला लोक विचारतात मात्र तुम्ही प्रसिद्धीपासून दूर गेला तर लोक तुम्हाला तितक्याच सहजतेने विसरुन जातात. यातीलच एक नाव म्हणजे आयशा जुल्का. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहे.

९० च्या दशकात बॉलीवूडवर आयशाची जादू होती. सलमान, आमिर, अजय, अक्षय कुमार हा मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत तिची जोडी जमली. मात्र आज ती या रुपेरी पडद्यावरुन गायब आहे.

आयशाने आपल्या बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात मीत मेरे मन का या चित्रपटापासून केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर १९९१मध्ये तिचा सलमानसोबत कुर्बान हा सिनेमा आला जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 

१९९२मध्ये आमिरसोबत आयशाचा जो जीता वही सिकंदर हा सिनेमा आला. जो सुपरहिट ठरला. १९९२मध्ये अक्षय कुमार आणि आयशा यांचा खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर या जोडीने अनेक चित्रपटांत काम केले. दोघांच्या प्रेमाची चर्चाही त्यावेळी बॉलीवूडमध्ये सुरु होती. 

२००३मध्ये आयशाने बिझनेसमॅन समीर वशी यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर ती काही चित्रपटात सहकलाकार म्हणून काम करत होती. मात्र २०१०नंतर ती पूर्णपणे रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. 

आयशा सध्या तिच्या पतीचा बिझनेस सांभाळतेय. याशिवाय गोव्यामध्ये तिचे स्वतंत्र बुटीकही आहे. ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असली तरी आयशा सध्या तिचे लाईफ एंजॉय करतेय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x