दुसऱ्या दिवशीही एअरलिफ्टचीही चांगली कमाई

खिलाडी स्टार अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. 

Updated: Jan 24, 2016, 04:58 PM IST
दुसऱ्या दिवशीही एअरलिफ्टचीही चांगली कमाई title=

मुंबई : खिलाडी स्टार अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. ओपनिंगच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने अधिक कमाई केली. शनिवारी या चित्रपटाने १४.६० कोटींची कमाई केली.

 

एअरलिफ्टला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी क्या कूल है हम ३ ला दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी तितकासा प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशीच्या कमाईत चांगलीच घट झालीये. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५.५० कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने १३.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. 

२२ जानेवारी रोजी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झालेत. दोन दिवसांच्या कमाईचा आकडा पाहता एअलिफ्ट बाजी मारणार असल्याचं दिसतंय.