अनुष्काच्या 'फिलौरी'चा ट्रेलर लाँच

विविधांगी भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एका नव्या रुपात 'फिलौरी' या चित्रपटातून आपल्या भेटीस येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. 

Updated: Feb 6, 2017, 01:22 PM IST
अनुष्काच्या 'फिलौरी'चा ट्रेलर लाँच title=

मुंबई : विविधांगी भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एका नव्या रुपात 'फिलौरी' या चित्रपटातून आपल्या भेटीस येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. 

या सिनेमात अनुष्का एका भुताची भूमिका साकारतेय. जिचे एक स्वप्न अपूर्ण राहिलेले असते. या सिनेमात कॉमेडी, रोमान्स तसेच इमोशनल टचही आहे. अनुष्काचे अनोखे रुप तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल. 

येत्या २४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अनुष्कासह या सिनेमात दलजित दुसांज, सुरज शर्मा आणि मेहरीन पिरझादा यांच्याही भूमिका आहेत.