नवी दिल्ली: विविध कारणांचा हवाला देत पुरस्कार परत करणा-या दहा चित्रकर्मींवर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन हल्लाबोल केलाय.. पुरस्कार परत करुन या चित्रकर्मींनी सरकारचा अवमान केला नसून ज्युरी, रसिक आणि कलेचा अवमान केल्याची टीका खेर यांनी केलीय.
काही लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान राहावे असं वाटत नाही, त्यामुळं हे सगळं सुरू असल्याचा आरोप अनुपम खेर यांनी लावला. #AwardWapsi गँगचा हे लोक सुद्धा भाग बनले, जय हो!, असं ट्विट त्यांनी केलंय.
This #AwardWapsiGang has not insulted the Govt. but The Jury, The Chairman of the Jury and the audience who watched their films. #Agenda
— Anupam Kher (@AnupamPkher) October 28, 2015
Some of these usual suspects of #AwardWapsiGang were instrumental in getting me out of Censor Board d moment Congress came in Power. #Agenda
— Anupam Kher (@AnupamPkher) October 28, 2015
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अनुपम खेर यांनी लिहिलं, लोकं एका अजेंड्यानुसार हे करत आहेत. जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत आला होता तेव्हा यातीलच काही जणांनी मला पण सेंसॉर बोर्डमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कुलबुर्गींची, पानसरेंची हत्या आणि एफटीआयआयमध्ये संचालक नियुक्तीबाबत झालेल्या वादाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये आनंद पटवर्धन, दिबाकर बॅनर्जी, परेश कामदार, लिपीका सिगं, निष्ठा जैन, किर्ती नखवा आणि हर्ष कुलकर्णींचा समावेश आहे. यासर्वांवरच अनुपम खेर बरसले आहेत.
आणखी वाचा - वाढत्या असहिष्णुतेविरोधात दिग्दर्शकांकडून ‘पुरस्कारवापसी’
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.