या स्टार क्रिकेटपटूची वहिनी बिग बॉसच्या घरात

कलर्स चॅनेलवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 10व्या सीजनला आजपासून सुरुवात होतेय. या सीजनमध्ये सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकही सहभागी होत आहेत.

Updated: Oct 16, 2016, 08:56 AM IST
या स्टार क्रिकेटपटूची वहिनी बिग बॉसच्या घरात title=

मुंबई : कलर्स चॅनेलवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 10व्या सीजनला आजपासून सुरुवात होतेय. या सीजनमध्ये सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकही सहभागी होत आहेत.

यात टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूची वहिनीही सहभागी होत आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगचा भाऊ जोरावर सिंग यांची पत्नी आकांक्षा शर्मा सहभागी होत आहे.

जोरावर आणि आकांक्षा यांचे लग्न 2014मध्ये झाले होते. मात्र आता त्यांचा घटस्फोट झालाय.