वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री

क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळं क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 

Updated: Feb 3, 2015, 12:51 PM IST
वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री title=

मुंबई: क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळं क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 

महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी महिन्यात एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सिनेनिर्मात्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. यानुसार बिग बी हे थेट भारत -पाक सामन्यात समालोचक म्हणून उपस्थित राहणार आहे. 

बच्चन यांच्यासोबत कपिल देव, शोएब अख्तर, हर्षा भोगले हे त्रिकूटही समालोचक म्हणून उपस्थित असतील. क्रिकेट आणि सिनेमाशी भारतीयांचं भावनिक नातं असून समालोचक म्हणून काम करण्यास मी उत्साहित आहे, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.