2000 ची नवी नोट म्हणजे 'पिंक' सिनेमाचा प्रभाव - अमिताभ बच्चन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

Updated: Nov 9, 2016, 12:21 AM IST
2000 ची नवी नोट म्हणजे 'पिंक' सिनेमाचा प्रभाव - अमिताभ बच्चन  title=

पंतप्रधानांच्या निर्णयावर अमिताभ यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला चाप बसण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 



बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी एक मस्करी करणारं ट्विट यावर केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, '2000 ची नवी नोट ही पिंक रंगाची आहे. त्यामुळे हा पिंक सिनेमाचा प्रभाव आहे.



अमिताभ बच्चन यांनी ही नोट त्यांच्या पिंक सिनेमाचा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे. अमिताभ यांच्या पिंक सिनेमाला अनेकांनी पसंती दर्शवली होती.