अमिताभ बच्चन यांचं मार्कंडेय काटजूंना कडक उत्तर

नेहमी आपल्या वक्तव्यांवरुन वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी काही दिवसापूर्वी एक वादात्मक फेसबूक पोस्ट शेअर केली होती. काटजू यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधला होता.

Updated: Sep 20, 2016, 04:46 PM IST
अमिताभ बच्चन यांचं मार्कंडेय काटजूंना कडक उत्तर title=

मुंबई : नेहमी आपल्या वक्तव्यांवरुन वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी काही दिवसापूर्वी एक वादात्मक फेसबूक पोस्ट शेअर केली होती. काटजू यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधला होता.

फेसबूकवर काटजू यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'अमिताभ बच्चन एक असे व्यक्ति आहेत. ज्यांच्या डोक्यात अक्कल नावाचा प्रकार नाही. अनेक पत्रकार त्यांची उगाचच प्रशंसा करतात मला वाटते त्यांच्याकडेही अक्कलेची कमतरता आहे." यावर आता अमिताभ यांनी त्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी म्हटलं की, 'जस्टिस काटजू आणि मी एकाच शाळेत शिकलो आहे. ते माझे सीनिअर होते. ते बरोबर आहेत. माझं डोकं खाली आहे.'
एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.