मुंबई : इतरांबद्दल आदर किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रशंसा करण्यासाठी पत्र लिहण्याची बीग बींची सवय एव्हाना चांगलीच लोकप्रिय झालीय. यावेळीही त्यांनी असंच काही करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
अमिताभ बच्चन यांनी यावेळी एकाच अभिनेत्रीला एक नाही तर चक्क दोन पत्र धाडली आहेत. 'तनु वेड्स मनु' या चित्रपटातून सध्या गाजणारी आणि नॅशनल अॅवॉर्ड विनर कंगना रानौत हिला पत्र लिहून बिग बींनी 'तनु'चं कौतुक केलंय.
'क्वीन' सिनेमासाठी अमिताभ सरांनी मला इंग्रजीत पत्र पाठवली होती. यावेळी त्यांनी मला हिंदी कविता लिहून पाठवली आहे. ही कविता मी माझ्या आई वडिलांना ऐकवू शकते कारण त्यांना फक्त हिंदी भाषा समजते' असं हर्षउल्हासित कंगनानं म्हटलंय. अमिताभ सरांनी मला दोन पत्र पाठवली होती. ही दोन्ही पत्र मला दोन अॅवॉर्ड सारखी आहेत, असंही तिनं म्हटलंय.
बिग बींनी पत्रात लिहिलेल्या काही गोष्टी कंगनाने सांगितल्या. 'ऐसा बहुत कम होता है की किसी परफॉर्मेंस को देखकर आंखें भर आए, तनु के रूप में तुमने मुझे रुला दिया... और दत्तो के लिए मुझे नहीं पता 'तनु' के जैसी दिखने वाली 'दत्तो' कौन है लेकिन वो मिले तो मेरी तरफ से शुभकामनायें जरूर देना', असं बीग बींनी या पत्रात म्हटलंय.
ज्या इंडस्ट्रीत कंगना आहे, त्याच इंडस्ट्रीचा मीही एक भाग आहे, हे माझं भाग्य आहे, असंही बीग बींनी या पत्रात म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.