न्यूयॉर्क : अमेरिकन अभिनेत्री फराह अब्राहमने लेहंगा चोळी परिधान केली, पण तिची सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या नेटीझन्सकडून खिल्ली उडवली जात आहे.
फराह अब्राहमने नुकत्याच पार पडलेल्या ‘एमटीव्ही मुव्ही अॅण्ड टीव्ही अवॉर्ड २०१७’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी फराह पारंपरिक भारतीय वेशभूषेमध्ये आली होती.
रेड कार्पेटवर लेहंगा- चोळी आणि बिंदी- मेहंदी अशा सुरेख रुपात फराहने छायाचित्रकारांना फोटोसाठी पोझही दिली. पण, सोशल मीडियावर तिने हे फोटो पोस्ट करताच अनेकांनी तिची खिल्ली उडवली.
मात्र भारतीय वेशभूषा आणि संस्कृतीबद्दल नेहमीच अनेकांना कुतूहल असतं. त्यातही काही परदेशी कलाकारांमध्ये तर याबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळते.
डाळींबी रंगाच्या लेहंग्यामध्ये फराह सुंदर दिसत होती. या कार्यक्रमातील काही फोटो तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट केले. सोबतच या लूकसाठी आपण बॉलिवूडची प्रेरणा घेतली असल्याचंही तिनं स्पष्ट केलं. पण, फोटो शेअर केल्यानंतर मात्र चाहत्यांच्या लाइक्ससोबतच काहीजणांची कटू बोलणीही तिला ऐकावी लागली.